मुरबाड नगर पंचायत निवडणुकीसाठी 13 जागेसाठी 51 उमेदवाराचे नसिब मतपेटीत बंद
कोणची सत्ता येणार याकडे तालुक्याचे लक्ष
राजेश भांगे मुरबाड
नगरपंचायतीची दुसरी निवडणूक जाहीर झाली.मात्र ओबिसिचा मुद्दा न सुटल्याने १७ पैकी १३ जागेसाठी ही निवडणूक संपन्न झाली.या निवडणूकीत भाजपाच्या विरोधात महाआ तरघाडी होईल असी जोरदार चर्चा असतानाच शिवसेना ,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समझोता न झाल्याने अखेर या निवडणूकित चौरंगी लढत पहावयास मिळाली. या निवडणुकीत आपल्याच पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे म्हणून भाजपा व शिवसेना पक्षाने शहरातील घर टू घर पिंजून काढला. या प्रचार फेरीत भाजपाच्या वतीने केद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील,आमदार किसन कथोरे तर शिवसेनेच्या वतीने पालक मंत्री एकनाथ शिंदे, हातमाघ मंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी जाहीर सेभे बरोबरच घराघरात जाऊन प्रचार करण्यावर भर दिल होता. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शांततेत प्रचार करण्यावर भर दिला होता. मंगळवार दि. २१ डिसेंबर रोजी १३ जागेसाठी निवडणूका घेण्यात आल्या. या वेळी कायदा सुव्येस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बदोबस्त लावण्यात आला होता. गावातील काही रस्ते वाहातूकी साठी बंद करण्यात आल्याने काही काळ वहातूक कोंडी झाली होती.
सकाळी सुरू झालेल्या मतदानात दुपार पर्यंत ५० टक्क्याच्या वर मतदान झाले होते. या निवडणुकीची मत मोजणी लगेच २२ डिसेंबर रोजी होणार होती परंतु ओबीसीच्या मुद्या मुळे आता मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार असल्याने उद्या पासुन विजयाची आकडेमोड मोठ्या प्रमाणात होणार असल्याने उमेदवारांना मात्र आपले देव पाण्यात बुडवून ठेवावे लागणार आहेत. या निवडणूकीत मुरबाडकर विकास कामांना मत देणार कि नवा पर्याय म्हणून शिवसेनेला मत देतात हे पहाण्यासाठी मात्र मतदारांना १९जानेवारी रोजी होणा-या मतमोजणीची वहाट
नगरपंचायत निवडणुकीत१३ जागे साठी ५१ उमेदवारांचे नशिब मतपेटीत बंद.