142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निरीक्षक अमितकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक
Raju tapal
November 08, 2024
25
142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निरीक्षक अमितकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक.
कल्याण :-
केंद्रीय जनरल निरिक्षक यांनी 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाला भेट दिली. मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक १५/१०/२०२४ रोजी च्या प्रसिद्धी पत्रकान्वये महाराष्ट्र राज्याच्या विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणूका २०२४ ची घोषणा केली.घोषित कार्यक्रमानुसार १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघामध्ये दिनांक २०/११/२०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.सदर मतदान प्रक्रियेचा भाग म्हणून आज दिनांक ७/११/२०२४ रोजी १२.०० वा.१४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाकरीता प्राप्त झालेल्या ७९६ BU, ३९८ CU व ४३१ VVPAT ची second Randonmmization प्रक्रिया मा. अमित शर्मा, निवडणूक निरीक्षक, रमेश मिसाळ, निवडणूक निर्णय अधिकारी.डाॅ. स्वाती घोंगडे,सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, महेश चौरे नोडल अधिकारी व त्यांची टीम तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार व प्रतिनिधी यांचे समक्ष सभा घेण्यात आली. सदरची प्रक्रिया पार पडण्यासाठी उपरोक्त नमुद निवडणूक लढविणारे उमेदवार व प्रतिनिधी यांचे निदर्शनास आणून दिले.मा. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे यांच्या आदेशानुसार प्रथम सरमिसळ (first Randonmmization) अंती सेंट्रल वेअर हाऊस तुर्भे येथून १४२- कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाकरीता प्राप्त झालेल्या ७९६ BU,,३९८ CU व ४३१ VVPAT EVM मशिन महिला उद्योग केंद्र, राॅयल रेसिडेंशीचया पाठीमागे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन जवळ, कल्याण पूर्व सुरक्षा कक्षात ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्वांना दिली. सदर EVMs मशिन या प्रत्येक मतदान केंद्राकरीता वापर करावयाच्या असल्याने प्रत्येक बुथ निहाय वापरात येणाऱ्या EVM ची अंतिम यादी तयार करावयाची प्रक्रिया म्हणजेच Second Randonmmization प्रक्रिया उपस्थित निवडणूक लढविणारे उमेदवार व प्रतिनिधी यांना अवगत करण्यात आले.व सर्वा समक्ष पार पाडण्यात आले.याबाबत सर्वांना माहीती देण्यात आली.तसेच प्रत्यक्ष ३३२ बुथवर वापरात आणावयाचे EVM ची यादी सर्व उपस्थितासमवेत अंतिम करून त्याची साक्षांकित प्रत सर्व निवडणूक लढविणारे उमेदवार व प्रतिनिधी यांना देण्यात आली.
Share This