142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ
Raju tapal
November 06, 2024
34
142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ
142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघा अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधकिारी (BLO) यांची बैठक संपन्न !
कल्याण (6) :-
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 142 कल्याण पूर्व विघानसभा मतदार संघात मतदार जनजागृतिसाठी विविध जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे. याच अनुषंगाने 142 कल्याण पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ आणि सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली मतदान जनजागृती टिममार्फत दररोज विविध ठिकाणी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व पर्यवेक्षक व सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभाग कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. ज्याप्रमाणे स्विप पथक प्रत्येक चाळ, बिल्डींग मध्ये जाऊन नागरिकांमध्ये मतदान जनजागृतीचे काम करीत आहे, त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या यादी भागातील प्रत्येक चाळ, इमारत यामध्ये जाऊन नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करावी. आपण देखील दररोज नागरिकांपर्यत पोहचून त्याना मतदानाचे महत्व पटवून देऊन मतदान करणेबाबत नागरिकांना प्रवृत्त करावे. त्याच्या अहवाल दररोज स्विप पथक यांचेकडे सादर करण्यात यावे. तसेच प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन सोसायटीमधील अध्यक्ष/सचिव यांना मिटींग लावणेबाबतचे पत्र देण्यात येऊन सदर ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यास त्यांना कळविण्यात यावे, सोसायटी किंवा चाळीमधील प्रत्येक नागरिक मतदान करतील याबाबत आपण दक्षता घ्यावी.
यासमयी नोडल अधिकारी शेखर धारणकर , स्वीप टिमचे कर्मचारी समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर,जितेश म्हात्रे, भारती डगळे इ. कर्मचारी उपस्थित होते.
Share This