• Total Visitor ( 447716 )
News photo

कल्याण डोंबिवलीत स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या CCTV च्या 170 बॅटऱ्या चोरीला 

Raju Tapal publisher March 24, 2026 15

कल्याण डोंबिवलीत स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या CCTV च्या 170 बॅटऱ्या चोरीला 



कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’ धोक्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारलेली यंत्रणा स्वतःच सुरक्षेच्या प्रतीक्षेत 

कल्याण :- कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसविण्यात आलेले CCTV कॅमेरेच आता असुरक्षित झाल्याचे समोर येत आहे. गेल्या वर्षभरात चोरट्यांनी CCTV प्रणालीतील बॅटऱ्या,UPS,स्विच आणि केबल्सवर डल्ला मारत तब्बल 170 बॅटऱ्या आणि 3 UPS,केबल,स्विच,PDU,जंक्शन बॉक्स चोरी गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हे सगळं चोरीला जात असताना या प्रकरणी गेल्या वर्षी फक्त अवघे एक तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे .परिणामी शहरातील सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून 300 हून अधिक ठिकाणी जवळपास 1000 CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांची देखभाल संबंधित कंत्राटदाराकडून केली जात असली,तरी प्रत्यक्षात हे कॅमेरेच आता चोरीच्या घटनांमुळे निष्क्रिय होत आहेत.चोरट्यांनी विशेषतः CCTV साठी लावण्यात आलेल्या बॅटऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. कल्याण पश्चिमेतील सुभाष चौक,प्रेम ऑटो,लाल चौकी,वालधुनी नाका,आधारवाडी अग्निशमन केंद्र तसेच कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसर आणि डोंबिवलीतील म्हसोबा चौक, मानपाडा रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅटरी चोरी झाली आहे. काही ठिकाणी प्रत्येकी 16 बॅटऱ्या,तर काही ठिकाणी 6 ते 8 अशा एकूण 170 बॅटऱ्या चोरीला गेल्याची नोंद आहे.याशिवाय 194 मीटर पॉवर केबल,184 मीटर कॅट-6 केबल, 13 स्विच,13 PDU आणि 13 जंक्शन बॉक्स देखील चोरट्यांनी लंपास केले आहेत. बॅटऱ्या चोरीला गेल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यास CCTV कॅमेरे बंद पडतात,या गंभीर प्रकारांनंतरही फक्त एकच गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्यानंतर पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार संबंधित कंत्राटदाराने केली आहे.महापालिका मुख्यालय आणि पोलीस उपायुक्त कार्यालयात CCTVचे नियंत्रण केंद्र असून, याच कॅमेऱ्यांच्या मदतीने यापूर्वी अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच कॅमेऱ्यांच्या उपस्थितीमुळे गुन्हेगारांमध्ये काही प्रमाणात भीतीही निर्माण झाली होती. मात्र आता हेच CCTV कॅमेरे असुरक्षित झाल्याने  नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारलेली यंत्रणा सध्या स्वतःच सुरक्षेच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement