गुनाट येथील आरोग्य शिबिरात १७५ जणांची आरोग्य तपासणी
शिक्रापूर:- कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन,प्राथमिक आरोग्य केंद्र निमोणे यांच्या वतीने शिरूर तालुक्यातील गुनाट येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात १७५ हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गावातील नागरिकांसह बालकांचीही आरोग्य तपासणी या शिबिरात करण्यात आली. सर्वसाधारण तपासणी,रक्तदाब,मधूमेह तपासणी,वजन,उंची मोजणे,नेत्र व त्वचारोग तपासणी या शिबिरात करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत औषधांंचेही वाटप या शिबिरात करण्यात आले. सी पी आर देण्याची पद्धत,साप चावणे,विषारी किटक चावणे,अपघात अशा प्रसंगी प्राथमिक मदत कशी करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले. गरोदर महिलांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र या शिबिरात घेण्यात आले. योग्य आहार,जीवनसत्वे याबाबत आरोग्य अधिका-यांनी या शिबिरात शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. आरोग्य कर्मचारी,स्वयंसेवक तसेच ग्रामस्थांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.