• Total Visitor ( 369543 )
News photo

शिक्रापूर शाळेतील १९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

Raju tapal July 19, 2025 156

शिक्रापूर शाळेतील १९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र   



सुयश उगले हा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत ९ वा



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिक्रापूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादित केले.

या शाळेतील २० विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या शिष्यवृत्तीची उज्ज्वल परंपरा अबाधित ठेवली आहे.

शाळेतील सोहम जुनघरे या विद्यार्थ्याची नवोदय परीक्षेत निवड झाली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका साधना शिंदे मॅडम यांनी दिली.

पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर येथील गुणवत्ताधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे-

सुयश उगले,आशुकुमार कटियार,यश पवार, हर्षवर्धन कर्हे,आईशा आलमेल,प्रद्युम धुप्पे, सोहम जुनघरे, अक्षदा गायकवाड,रुद्र वीर राठोड,सेजल लवांडे,आर्य शिंदे,राज पवार,श्रेयस अडसूळ, निशा कांबळे,शहाबाज तांबोळी, कृष्णा जाधव, संस्कृती पांढरे, तनुष्का पाटील,ज्ञानेश्वरी जगताप या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मधुमालिनी गोडसे,रजनी भिवरे,सुशीला तांबे, संजया मांडगे, मंगेश येवले आणि सारिका गुंजाळ या वर्गशिक्षकांनी मार्गदर्शन केले

मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सनी जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत मांढरे व सर्व सदस्य शिक्रापूरचे सरपंच रमेशराव गडदे, उपसरपंच वंदनाताई भुजबळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच सुभाष खैरे, शिक्षण तज्ज्ञ नवनाथभाऊ सासवडे, शाळेच्या मुख्याध्यापिका साधना शिंदे, केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, विस्ताराधिकारी वंदना शिंदे मॅडम व मुकुंद देंडगे साहेब, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी अभिनंदन केले.

          


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement