24-कल्याण लोकसभा मतदार संघ
Raju Tapal
May 14, 2024
74
*24-कल्याण लोकसभा मतदार संघ*
*39 सूक्ष्म निरीक्षक (Micro Observer) 24- कल्याण लोकसभा मतदार संघात दाखल !*
दि. 20 मे 2024 रोजी, 24-कल्याण लोकसभा मतदार संघात संपन्न होणा-या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज 39 सूक्ष्म निरीक्षक 24-कल्याण लोकसभा मतदार संघात दाखल झाले असून ते मा. निवडणूक निरीक्षक यांच्या करीता काम करणार आहेत. या सूक्ष्म निरीक्षकांना आज सूक्ष्म निरीक्षकांच्या कर्तव्याबाबत, मतदान यंत्र हाताळणीबाबत, तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत पॉवरपॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मा.निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन, निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते, पदनिर्देशित अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते उपस्थित होत्या. सूक्ष्म निरीक्षक दि. 20 मे 2024 रोजी, मतदानाच्या दिवशी संपन्न होणा-या मतदान प्रक्रियेचा अहवाल मा.निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन यांना सादर करतील.
Share This