• Total Visitor ( 84204 )

पाण्याची टाकी कोसळून ४ जणांचा मृत्यू

Raju tapal October 24, 2024 67

पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना

पाण्याची टाकी कोसळून ४ जणांचा मृत्यू

पुणे:- एकीकडे विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु असताना दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरीतील सदगुरु नगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. पण या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे. तात्पुरत्या स्वरूपाची सोय म्हणून बांधलेली पाण्याची टाकी अचानक कोसळली, या दुर्घटनेत ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे कामगार लेबर कॅम्पमध्ये वास्तव्यास होते. आज (गुरूवारी) सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. तर या ठिकाणी असलेल्या इतर कामगारांनी आणि प्रत्यक्षदर्शींंनी ही घटना टाकी नुकतीच बांधली असून त्यात पाणी भरल्याने टाकी कोसळून दुर्घटना झाल्याचं म्हटलं आहे. संबधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिस आणि अग्निशामक दल, तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी बचावकार्य केले. पाण्याच्या टाकीच्या कोसळण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून संबंधित कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement