• Total Visitor ( 136666 )

राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत ५५ स्पर्धकांचा सहभाग 

Raju tapal April 15, 2025 17

राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत ५५ स्पर्धकांचा सहभाग 

बेंडभर, परदेशी आणि कदम राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत परीक्षक

शिरूर :- सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पुणे जिल्ह्यातील आघाडीचे साहित्यिक सचिन बेंडभर, कवी मनोहर परदेशी आणि कवी अनिल कदम यांची निवड करण्यात आली होती. यावेळी कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुणे येथील एस एम जोशी हिंदी माध्यमिक विद्यालय, गोळीबार मैदान येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत एकूण ५५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी उपस्थित शिक्षक साहित्यिकांनी निसर्ग, नातेसंबंध, सामाजिक, राजकीय, वाढते शहरीकरण आदी विषयांवर कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाबराव गवळे यांनी केले. तर तुकाराम बेनके यांनी आभार मानले.

प्रतिनिधी:- पत्रकार विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर)
 

Share This

titwala-news

Advertisement