गुजर प्रशालेत ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात
शिरूर :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशालेतील विद्यार्थ्यांची गावात प्रभात फेरी काढून व देशभक्तीपर घोषणा देत प्रजासत्ताक दिनाची सुरूवात करण्यात आली.
झेंडावंदनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्हिजन इन्फ्रा या कंपनीचे उद्योजक विनोद शोभाचंद गांधी, सचिन विनोद गांधी व गणेश यादव उपस्थित होते. शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे, संचालक महेश ढमढेरे, राजेश ढमढेरे, परेश सातपुते, विजयकुमार गुजर, साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन मुसमाडे,मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, पराग चौधरी, उषाताई बाबासाहेब नलगे, ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते जावेद बागवान, कमलेश पोखर्णा, आर्यन गांधी, आराध्या गांधी, प्रफुल्ल गुंदेचा तसेच गावातील प्रतिष्ठित गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी समरगीते, कृतीयुक्त देशभक्तीपर गीते उठावदारपणे सादर करून कार्यक्रमाला शोभा आणली. प्रशालेचे माजी विद्यार्थी विजय कुंभार सर यांना महात्मा फुले सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व माजी सैनिक दादासाहेब केदारी, संदीप ढमढेरे यांनी शाळेच्या बांधकामासाठी भरीव देणगी दिल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
शालेय जीवनात शिस्त किती महत्त्वाची असते व त्यातूनच पुढे देशातील सुजाण नागरिक कसा घडतो असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन गांधी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून १९५२ सालापासूनच्या संस्था स्थापनेचा इतिहास व वाटचाल सांगितली. संस्थेची वाटचाल व कार्याने प्रेरित होऊन, प्रशालेत होणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक करून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनोद गांधी यांनी संस्थेला एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची भरीव देणगी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे प्राध्यापक कुंडलिक कदम व उपशिक्षक जालिंदर आखाडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रशालेच्या सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अरुण भगत यांनी आभार मानले.