उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ९४ उमेदवार रिंगणात,
अशी आहे यादी!
मुंबई - विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने एकूण ९४ उमेदवारांना संधी दिली आहे. आमचं सगळं ठरलं आहे असं महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अर्ज मागे घेण्याचा दिवस हा ४ नोव्हेंबर होता. त्या दिवशी अनेक अर्ज मागे घेण्यात आले. बंडखोरांची बंडखोरी शमवण्यात आली. आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कोण उमेदवार रिंगणात आहेत जाणून घेऊ.
उद्धव ठाकरेंचे ९४ उमेदवार कोण?
धुळे शहर-अनिल गोटे
चोपडा – प्रभाकर सोनावणे
जळगाव- जयश्री महाजन
चाळीसगाव-उन्मेश पाटील
पाचोरा-वैशाली सूर्यवंशी
बुलढाणा-जयश्री शेळके
मेहेकर-सिद्धार्थ खरात
बाळापूर-नितीन देशमुख
अकोला पूर्व-गोपाल दातकर
वाशिम- सिद्धार्थ देवळे
अकोला पूर्व-गोपाल दातकर
बडनेरा-सुनील खराटे
दर्यापूर-गजानन लवटे
रामटेक-विशाल बरबटे
वणी-संजय दरेकर
लोहा-एकनाथ पवार
कळमनुरी-संतोष टारफे
हिंगोली-रुपाली राजेश पाटील
परभणी-राहुल पाटील
गंगाखेड-विशाल कदम
परतूर-आसाराम बोराडे
सिल्लोड-सुरेश बनकर
कन्नड-उदयसिंह राजपूत
संभाजीनगर मध्य-बाळासाहेब थोरात
संभाजीनगर प.-राजू शिंदे
पैठण-दत्ता गोराडे
वैजापूर-दिनेश परदेशी
नांदगाव-गणेश धात्रक
मालेगांव बाह्य-अद्वय हिरे
निफाड-अनिल कदम
नाशिक मध्य-वसंत गीते
नाशिक पश्चिम-सुधाकर बडगुजर
देवळाली-योगेश घोलप
पालघर-जयेंद्र दुबळा
बोईसर- डॉ. विश्वास वळवी
भिवंडी ग्रामीण-महादेव घाटळ
कल्याण पश्चिम-सचिन बासरे
अंबरनाथ-राजेश वानखेडे
कल्याण पूर्व- धनंजय बोडारे
डोंबिवली-दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण-सुभाष भोईर
ओवळा माजीवाडा-नरेश मणेरा
कोपरी पाचपाखाडी-केदार दिघे
ठाणे-राजन विचारे
ऐरोली-मनोहर मढवी
बोरीवली-संजय भोसले
दहिसर-विनोद घोसाळकर
मागाठाणे-उदेश पाटेकर
विक्रोळी-सुनील राऊत
भांडुप पश्चिम-रमेश कोरगांवकर
जोगेश्वरी पूर्व-अनंत नर
दिंडोशी-सुनील प्रभू
गोरेगांव-समीर देसाई
वर्सोवा-हारुन खान
अंधेरी पूर्व-ऋतुजा लटके
विलेपार्ले-संदीप नाईक
घाटकोपर पश्चिम-संजय भालेराव
चेंबूर-प्रकाश फातर्पेकर
कुर्ला-प्रविणा मोरजकर
कलीना-संजय पोतनीस
वांद्रे पूर्व-वरुण सरदेसाई
वडाळा-श्रद्धा जाधव
माहिम-महेश सावंत
वरळी-आदित्य ठाकरे
शिवडी-अजय चौधरी
भायखळा-मनोज जामसुतकर
मलबार हिल-भैरु चौधरी जैन
पनवेल-लीना गरज
कर्जत-नितीन सावंत
उरण-मनोहर भोईर
पेण-प्रसाद भोईर
महाड-स्नेहल जगताप
खेड आळंदी-बाबाजी काळे
कोथरुड-चंद्रकांत मोकाटे
नेवासा-शंकरराव गडाख
श्रीगोंदा-अनुराधा नागावडे
गेवराई-बदरामराव पंडीत
औसा-दिनकर माने
उमरगा-प्रवीण स्वामी
धाराशिव-कैलास पाटील
बार्शी-दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण-अमर पाटील
सांगोले-दीपक आबा साळुंखे
पाटण-हर्षद कदम
सातारा-अमित कदम
दापोली-संजय कदम
गुहागर-भास्कर जाधव
रत्नागिरी-सुरेंद्रनाथ माने
राजापूर-राजन साळवी
कणकवली-संदेश पारकर
कुडाळ-वैभव नाईक
सावंतवाडी-राजन तेली
राधानगरी-के. पी. पाटील
शाहूवाडी-सत्यजीत पाटील
मिरज-तानाजी सातपुते
महाविकास आघाडीचा फॉर्म्युला १०७-९४-८७ असा आहे
उद्धव ठाकरेंनी एकूण ९४ उमेदवार दिले आहेत. १०७ जागांवर काँग्रेस तर ८७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष असे तीन पक्षांचं जागावाटप झालं आहे हा फॉर्म्युला आता समोर आला आहे. जागावाटपात काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचं दिसून येतं आहे. कारण काँग्रेसने १०७ जागांवर दावा केला आहे. बंडखोरांची बंडखोरी शमवण्याचं मोठं आव्हान या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांसमोर होतं. त्या पक्षांनी ती बंडखोरी आणि अपक्ष उभे राहणाऱ्यांची संख्या कमी केली आहे. २० नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आता महाविकास आघाडीला कौल मिळतो की महायुतीला हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.