• Total Visitor ( 84202 )

९७ लाखाची रोकड पळवून नेणाऱ्या चालकाला साथीदारासह अटक

Raju tapal October 09, 2021 38

९७ लाख रूपयांची रोकड कारसह पळवून नेणा-या चालकाला साथीदारासह अटक ; येरवडा,कर्जत पोलीसांची संयुक्त कारवाई 

             -------------------

सुकामेवा विक्रीचा व्यवसाय करणा-या  व्यावसायिक लघुशंकेसाठी उतरल्यानंतर कारमध्ये ठेवलेली ९७ लाख रूपयांची रोकड कारसह पळवून नेणा-या चालकाला पुण्यातील येरवडा,नगरमधील कर्जत पोलीसांनी  त्याच्या साथीदारासह अटक केली.

त्यांच्याकडून ६० लाख रूपये पोलीसांनी जप्त केले .

विजय महादेव हुलगुंडे वय २५ रा.काटेवाडी ,जामखेड जि.अहमदनगर , नाना रामचंद्र माने वय २५ रा. मलठण ,कर्जत जि.अहमदनगर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

फिर्यादीचा सुकामेवा विक्रीचा व्यवसाय असून सोमवारी ते दिवसभर मालाची  विक्री केलेल्या व्यावसायिकांकडून पैसे घेवून जात होते. ते लघुशंकेसाठी उतरल्यानंतर कारमध्ये ठेवलेली ९७ लाख रूपयांची रोकड कारसह चालकाने पळवून नेली होती. 

कर्जत पोलीस तपास करत असताना संबंधित आरोपी पुरंदरमधील वीर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने क्राईम युनिट ५ चे पोलीसांनाही वीर येथे बोलावण्यात आले. आरोपी वीर येथील शाळेजवळ लपून बसलेले होते. ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी नाना माने मिळून आला. आरोपी विजय हुलगुंडे पळून गेला. त्यास कर्जत पोलीसांनी पाठलाग करून पकडले. 

येरवडा ,पुणे पुढील तपास करीत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement