आंतरराष्ट्रीय स्तरावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना
कोळीवलीतील अजित कारभारी यांचा विशेष पराक्रम
ठाणे जिल्ह्यामधील कल्याण तालुक्यातील कोळीवली गावातील कुस्तीपटु कैलासवासी बळीराम महादू कारभारी यांचा सुपुत्र अजित कारभारी यांनी ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत ( नि.) यांच्या प्रोस्तहनाने रशिया मधील एरोग्लॅड कोलम्ना येथे - ३६°C तापमानामध्ये एल ४१० या हवाई जहाजातुन ५१००मीटर (१६,७३२ फुट) आकाशात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या ध्वज फडकवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देत प्रथम भारतीय नागरिक ठरले.
कर्नल कोस्त्या क्रिवोशिव (२७००० जंप मास्टर - रशियन आर्मी स्कायडाइव मुख्य प्रशिक्षक - आर्मी बेस) व आमेचे मित्र आनी यूनाइटेड स्टेट पैराशूट एसोसिएशन (अमेरिका) चे स्काईडाइविंग प्रशिक्षक राहुल देसाई (डकरे) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे अजित कारभारी विभागीय क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांनी साहसी कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली.