• Total Visitor ( 134422 )

शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

Raju tapal January 15, 2025 28

शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत 

शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सादर केला कलेचा आविष्कार

नाटिका,एकांकिका व समूह नृत्याने वेधले लक्ष ; उपस्थ‌ितांची दाद

चिमुकल्या 'सरपंच बाई'ने समाजाचे लक्ष वेधण्याचा केला प्रयत्न : ' मी सरपंच बोलते ' नाटिका ठरली लक्षवेधी

आज डॉ.पंजाबराव देशमुख क्रीडा नगरीत पारितोषिक वितरण

अमरावती,ता.१५:- जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा स्तरीय प्राथमिक शालेय क्रिडा क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालाच्या पटांगणात सुरू आहे.दरम्यान सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये करावके गीत,समुह नृत्य,भक्तीगीत,भावगीत,लोकगीत,सिनेगीत,अभिनय,हास्य जत्रा असे बहारदार कार्यक्रम सादर करण्यात येत आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी कलेचा आविष्कार सादर केला.
         जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरीय प्राथमिक शाळेत क्रिडा व सांस्कृतिक  महोत्सवाला  सुरुवात झाली होती. या क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे विधिवत उद्घाटन राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तिवसा येथील गटशिक्षणाधिकारी डॉ.नितीन उंडे, चांदुर रेल्वे येथील संदीप बोडखे,नांदगाव खंडेश्वर येथील  कल्पना ठाकरे, वरूड येथील विनोद गाढे, अंजनगाव येथील गीरासे,मोर्शी येथील गुणवंत वरघट,दर्यापूर येथील  संतोष घुगे,भातकुली येथील दीपक कोकतरे,धामणगाव रेल्वे येथील सपना भोगावकर,अमरावती येथील धनंजय वानखडे,अचलपूर येथील राम चौधरी,क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर,शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर मोहने,संगीता सोनोने,मोहम्मद अशफाक व आदी उपस्थित होते.
          दरम्यान सांस्कतिक कार्यक्रमामध्ये भातकुली,अंजनगाव सुर्जी,वरूड,धारणी,तिवसा,धामणगाव रेल्वे,दर्यापूर, मोर्शी,चांदुर रेल्वे,चांदुर बाजार,नांदगाव खंडेश्वर,अचलपूर,अमरावती,तिवसा,चिखलदरा या पंचायत समितीमधील विद्यार्थ्यांनी आपला कलेचा आविष्कार सादर केला.यात भातकुली पंचायत समितीतील कानफोडी, वाकी रायपूर  शाळेने निदर्शने व नृत्य सादर केले.अंजनगाव पंचायत समितीतील विहिगाव शाळेने ग्रामीण नाट्य व आदिवासी नृत्य सादर केले.वरूड पंचायत समितीतील खाडा शाळेने आदिवासी नृत्य व सावंगी शाळेने एकल नृत्य सादर केले. धारणी पंचायत समितीतील जांबु शाळेने संगीतमय नाटिका, मोगर्दा शाळेने समूह नृत्य तर हातिदा शाळेने लावणी सादर केली.तिवसा पंचायत समितीमधील धोत्रा शाळेच्या गौरी वानखडे हिने लावणी नृत्य सादर केले.दिवानखेड शाळेने निदर्शने सादर केलीत.धामणगाव पंचायत समितीतील झाडा शाळेने ' सूनो बेटी शस्त्र उठालो ' हा कार्यक्रम सादर केला.तळेगाव दशासर सोशल मिडीयाचा गैरवापर यावर निदर्शने सादर केली.तर पिंपळखुटा तेथील इयत्ता पहिलीतील सानवी भोयर या विद्यार्थिनीने ' मी सरपंच बोलते' हे एकपात्री नाटिका सादर केली.दर्यापूर पंचायत समितीमधील रामतीर्थ,करतखेडा  व पेठ इबारतपुर शाळेने कार्यक्रम सादर केले.सांस्कृतिक कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून प्रा.डॉ.मनोज उज्जैनकर,प्रा.अमोल पानबुडे,जान्हवी काळे हे उपस्थित होते.असे प्रसिध्दी समितीचे प्रमुख विनोद गाढे,विनायक लकडे,शकील अहमद,
राजेश सावरकर,श्रीनाथ वानखडे यांनी कळविले आहे.

चिमुकल्या 'सरपंच बाई'ने समाजाचे लक्ष वेधण्याचा केला प्रयत्न

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता पहिलीत विद्यार्थिनी सानवी भोयर हिने एकपात्री ' मी सरपंच बोलते ' ही सादर केली तेव्हा उपस्थितांनी उस्फूर्तपणे दाद दिली.प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनेने यांनी तिला कडेवर उचलून तिचे कौतुक केले रोख बक्षीस दिले.या विद्यार्थिनीच्या मार्गदर्शक शिक्षिका हर्षाली तरार ह्या आहेत.या चिमुकल्या विद्यार्थिनीने  संविधानाने महिलांना जरी सर्व अधिकार दिले आहे. तरी सुद्धा आज समाजाकडून महिलांवर आज अत्याचार होत आहे. त्यांच्या कडे दुर्लक्ष होत आहे.या बाबी कडे त्या चिमुकल्या 'सरपंच बाई'ने समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला .त्याच बरोबर आपल्या लेकीला शिकवा, आपले गाव स्वछ ठेवा ,तेव्हाच आपल्या गावाचा आपल्या देशाचा विकास होईल असा संदेश तिने दिला. 
 

Share This

titwala-news

Advertisement