एक दिवा मतदारांसाठी
भातकुली पंचायत समितीत दिपोत्सव साजरा
भातकुली/अमरावती दि.२-उत्सव लोकशाहीचा,सन्मान मतदारांचा या थीमवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी संजीता महापाञ यांनी पुढाकार घेऊन दिपोत्सव करुन मतदार जनजागृती सुरु केली आहे.दरम्यान तालुकास्तरावर एकञित येऊन मतदारांच्या सन्मानासाठी दिपोत्सवाच्या माध्यमातुन मतदार जनजागृती उपक्रम भातकुली पंचायत समिती कार्यालयात गुरुवारी एक दिवा मतदारा करीता हा उपक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला भातकुली पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रविण वानखडे,प्राथमिक शिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने,बडनेरा विधान सभेचे स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी दिपक कोकतरे,शालेय पोषण आहार अधिक्षक नरेंद्र गायकवाड,तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.स्वेता सालफळे,विस्तार अधिकारी प्रल्हाद तेलंग,शकील पठाण,प्रविण कोथलकर,बद्रे साहेब,भुयार साहेब,मडावी साहेब,गट साधन केंद्राचे श्रीकांत खरबडे,हर्षवर्धन इंगळे,सतिश वानखडे,चंद्रकांत कडवे,हेमंत कुंभलवार,सुजाता सोनोने,मोनिका मोहोड,मिनाक्षी खरडमल,रुपाली सिरोटे,पोर्णिमा भूगूल,मंदा आंडे सह पंचायत समिती मधिल अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी मतदानाची शपथ घेतली.दिप लाऊन व फटाके फोडुन दिपोत्सव साजरा करण्यात आला.
लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टिकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहुना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे आहे. एक सुज्ञ मतदार या नात्याने मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजवावा.असे आवाहन उपस्थित अधिकारी यांनी व्यक्त केले असे स्वीपचे पदाधिकारी राजेश सावरकर यांनी कळविले आहे.