अमरावती जिल्हा परिषद मधिल सेवानिवृत्त शिक्षकांचे २८कोटी अंशदान उपदान रक्कम स्थकली
प्राथमिक शिक्षक समितीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन
अमरावती दि.२२ -: शिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प.अमरावती यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जि.अमरावतीने निवेदन सादर सादर करुन
सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी यांचे प्रलंबीत अंशदान व उपदान करिता अनुदान उपलब्ध करून देण्याची केली मागणीचे निवेदन देण्यात आले.शिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प.अमरावती यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दि.१४ फेब्रुवारी २०२५ रोज शुक्रवार ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जि.अमरावती च्या वतीने डॉ.अरविंदजी मोहरे (शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प.अमरावती) यांना निवेदन सादर करण्यात आले.जि.प.अमरावती अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी यांचे अंशदान व उपदान संबंधीचे अनेक प्रस्ताव प्रलंबीत आहेत.यामागचे कारण जाणून घेतले असता, या करिता अनुदान उपलब्ध नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी यांचे 28 कोटी रुपयाचे अंशदान उपदान चे प्रलंबित प्रस्ताव निकाली निघावेत याकरिता अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी आपली मागणी सहानुभूती पूर्वक ऐकून घेवून अंशदान व उपदान याकरिता अनुदान उपलब्ध करून देण्या संबधाने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वस्त केले.निवेदन देतेवेळी संभाजी रेवाळे सर (मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,अमरावती),उमेशभाऊ चुनकीकर (तालुकाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, भातकुली),प्रफुल्लजी वाठ (माजी तालुका सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती भातकुली) व शैलेंद्र स.दहातोंडे (जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,अमरावती) उपस्थित होते.असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.