ट्रॅक्टर ट्राॅलीच्या धडकेत ढोकसांगवी येथील तरूणाचा मृत्यू
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- ट्रॅक्टर ट्राॅलीच्या धडकेत ढोकसांगवी येथील तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे - अहिल्यानगर महामार्गावर कारेगाव येथे सोमवारी दि.२५ आॅगस्टला सकाळी घडली.
रत्नदीप कृष्णा सावळे वय -१९ रा.पाचंगेवस्ती ,ढोकसांगवी ता.शिरूर असे अपघातातील मृत तरूणाचे नाव असून शशिकला सहदेव बर्डे वय -७० रा.हातोला ता.दारव्हा जि.यवतमाळ असे या अपघातातील गंभीर जखमी वृद्धेचे नाव आहे.
या अपघाता बाबत समजलेल्या माहितीनूसार,फिर्यादी निरंजन चंपतराव सावळे यांचा पुतण्या रत्नदीप सावळे व त्यांची सासू शशिकला बर्डे हे एम एच ३७ एसी ९४८८ या क्रमांकाच्या दुचाकीवरून शिरूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी एम एच १६ बी झेड ८४१५ या क्रमांकाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर भरधाव वेगात, वाहतुकीच्या नियमांकडे दूर्लक्ष करून डिव्हायडरकडे वळविण्यात आल्याने ट्रॅक्टर ट्राॅलीची दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत रत्नदीप सावळे गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल चव्हाण या अपघाताचा तपास करत आहेत.