नाणेघाट विक्रिकेंद्र येथे श्रमिक मुक्ती संघटना यांचा आदिवासी स्वशासन गौरव अभियान व वनहक्क पंधरा वर्ष निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन.
मुरबाड तालुक्यातील टोकावडे विभागामधील मुरबाड माळशेज हायवेवरील नाणेघाट विक्रिकेंद्रावर श्रमिक मुक्ती संघटना व वननिकेतन ठाणे यांचा नाणेघाट विक्रिकेंद्र येथे वनहक्क पंधरा वर्ष निमित्ताने आदिवासी स्वशासन गौरव अभियानाचे आयोजन केले होते. या कार्य्रमामध्ये आदिवासी समाजाला पेसा कायदा, वनहक्क, रोजगार व पर्यावरण या बद्दल माहिती देण्यात आली, तसेच यावेळी लहान मुलांचे नृत्य,कामडी नाच तसेच आदिवासी संस्कृति मधील वेगवेगळ्या कलांचे प्रदर्शन करण्यात आले.तसेच श्रमिक मुक्ती संघटना यांच्या आजपर्यंतच्या संपुर्ण कामाची माहिती असलेल्या पुसेतकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे बक्षिस ही मुलांना देण्यात आली. आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी श्रमिक मुक्ती संघटना अध्यक्षा इंदवी ताई तुळपुळे, प्रभाकर देशमुख, दशरथ लाख, गणपत वाघ, महेश रूमाल, लक्ष्मण वाघ,विकास बरतड, मधुकर वाघ, कमळु खाकर, समाजसेवक रविंद्र मराडे, भारती वाघ, मेघा वाघ, सुप्रिया हरड जि. प. सदस्या नंदा उघडा, रमेश उघडा तसेच शहापुर व मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थ व तरूण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.