आई सन्मानासाठी श्रमजीवी संघटनेचे अनोखे आंदोलन
तहसिलदारांच्या आईच्या नावासह लावणार पाट्या
तहसिल कार्यालयातच करणार सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आई / स्त्री सन्मानसाठी क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यंच्या जयंती निमीत्त "सर्व शासकीय व खाजगी दस्तऐवजांवर मुलाच्या नावापुढे वडिलांसोबत आईचेही नाव समाविष्ट करावे" या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या महिला ठिणगी विभागाकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. ठाणे,पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील तहसीलदारांना त्यांच्या नावाच्या पाट्या, ज्यामध्ये सुरुवातीला संबंधित तहसीलदारांच्या नाव, त्यानंतर त्यांच्या आईचे नाव, त्या पुढे वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा प्रकारे लिहिण्यात आलेले आहे. तसेच यावेळी संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुखमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजीराव शिंदे यांना देण्यात येणार आहे.
श्रमजीवी संघटनेची मागणी
ज्या सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांवर, दस्तऐवजांवर जिथे कोणत्याही
व्यक्तीचे नाव लिहिण्याची सक्ती असते. तिथे नाव मधले नाव आणि आडनाव असे तीनच रकाने उपलब्ध असतात. यात एक रकाना वाढवून नाव आईचे नाव वडिलांचे नाव आडनाव असे चार रकाने करावेत व ते भरणे सक्तीचे करुन सर्व मातांना त्यांचा समानतेचा अधिकार देण्यात यावा याबाबत महाराष्ट्र सरकारने पथदर्शी निर्णय घेऊन त्याबाबत अंमलबजावणीचे आदेश सर्व संबंधितांना द्यावेत अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी आई सन्मान कार्यक्रमां अंतर्गत कल्याण तहसिलदार यांच्या नांवाची पाटी त्या आईच्या नांवासह त्यांना देण्यात आली सुरूवात शासकिय कार्यालयातील आधिकारी यांच्या पासून सुरूवात करण्याचे संकल्प करण्यात आले.