आज कल्याण तहसीलदार कार्यालय समोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले
Raju Tapal
November 22, 2021
58
आज कल्याण तहसीलदार कार्यालय समोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी आमदार प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, सरचिटणीस मनोज राय, अर्जुन म्हात्रे, भरत भाऊ फुलोरे, मोरेश्वर भोईर, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर,संजय मोरे,नंदू परब,राजेंद्र वारे, पांडुरंग भोसले , संजीव बिडकर, प्रदीप भोईर, संतोष शिंदे, विलास खंडीझोड, नगरसेवक विकी तेरे, गणेश माने तावरे विशू पेडणेकर मंदार हळबे, मोनिला तरे, नाना सूर्यवंशी, सुभाष,म्हस्के,उपेक्षा भोईर, शक्तिवान भोईर शाम पाटील जिल्हा परिषद,राजेश कोठले,निलेश बोबडे,सौ भोईर,प्रिया शर्मा,प्रिया जाधव अनेक पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते
भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा तर्फे सत्ताधारी तिघाडी सरकारच्या काळात वाढलेल्या राजकीय गुन्हेगारी विरोधात- राजकीय गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांसाठी जुलमी सरकार, भ्रष्टाचारी सरकार, कामगारांसाठी असंवेदनशील सरकार, वसुली सरकार, अमरावती पूर्वनियोजित दंगलीचा जाहीर निषेध आज भारतीय जनता पार्टी तर्फे तहसीलदार कार्यालय येथे करण्यात आले यावेळी तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, अन्याय आत्याचार वाढत चालले आहेत, शेतकरी यांच्या वर जुलमी होत आहे, वसुली सरकार आहे, अमरावती येथे घडलेली घटना निंदनीय आहे तसेच जे काही भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते ईतर पक्षात प्रवेश करणार आहेत ,आम्ही काही कमी पडलेलो का, जाणा-यांचे आम्ही अभिनंदन करतो, आम्हाला वाईटही तेवढेच वाटते, जास्त उचित बोलणे योग्य होणार नाही असे सांगितले.
Share This