उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्रात बंदपुकारला होता. या बंदमध्ये शिवसेना , काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाले. एकीकडे बंदला समिश्र प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून या बंदला विरोध केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी नुकतेच केलेल्या ट्विटमध्ये आज वसूली चालू आहे का बंद? असा प्रश्न विचारून महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. तसेच, महाराष्ट्र बंद नही है, असा हॅशटॅगही अमृता फडणवीस यांनी या ट्विटमध्ये वापरला आहे.