• Total Visitor ( 133401 )

अखिल महाराष्ट्र साहित्य मंच लावणी समूह आयोजित...

Raju Tapal February 15, 2022 43

अखिल महाराष्ट्र साहित्य मंच लावणी समूह आयोजित...
प्रथम गवळण संमेलन...
  शनिवार दि १२/२/२०२२ रोजी ठीक रात्रौ. ९.३० वा. गुगल मीटवर गवळण संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा कार्यक्रमाची एक साहित्यिक मेजवानी   अनुभवता आली..
या संमेलनाचे सुत्रसंचलन.. विजया शिंदे गळवण गीतांच्या  चक्क सुरुवात करुन गवळण  गाजलेल्या गीताने सुरुवात केली व मने आनंदी करून गवळण मय वातावरणात रंगून गेली...
तसेच मुक्तासुत यांचे स्वरचित गणपती स्तवन पल्लवी ताई यांनी गाऊन ईश्वर चरणी प्रार्थना केली.
सन्मा.योगेश चाळके मनोगत सर (मुक्तासुत)अध्यक्ष अखिल महाराष्ट्र साहित्य मंच गवळण बदल प्रशासकीय नोंद घेत गौळणही पारंपारिक पध्दतीने राधाकृष्णाच्या शृंगारलीला नृत्य नाट्य संगीत या घटकांनी सादर केली जाते व हा प्रकार संत वाडःमयीन भूमिकेतून लोकप्रिय झाला हेही सांगून सर्व समूह सदस्य यांच्या लिखाणावर कौतुकाची थाप मारली...ही एक अभिमानाची बाब आहे व सर्व रसिक भारावून गेले
कार्यक्रमाचे अध्यक्ष.. अशोकजी कांबळे सरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली त्यानंतर  त्याचे अध्यक्षीय भाषण अगदी नवीन प्रेरणादायी ठरेल असेच केले ते म्हणाले या समाजात अजूनही गुलाबाच्या कळी कुसरल्याजात त्या कुस्करुन टाकू नये तर फुलू द्यावयाचे आहेत तसेच अनेक जातीयवाद घडवून मनमुराद समाजात भांडणे लावण्याचे काम होते तेथे ही चाप बसावा अशा आशयाचा  गवळण लिहाव्यात व वाचकांच्या ह्दयापर्यत भिडाव्यात व पुन्हा या गवळणी साठी कृष्णअवतार या धरतीवर व्हावा...असे अगदी मंत्र मुग्ध करणारे भाषण होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक..प्रियाताई मयेकर...यांनी अखिल महाराष्ट्र साहित्य मंच लावणी समूहचे महत्त्व व गवळण हा तमाशातील एक भाग आहे पारंपारिक तमाशा सादरीकरणामध्ये गवळण  सादर करण्याची प्रथा आहे.मथुरेच्या बाजारी निघताना कृष्णा व त्यांचे मित्र रस्ता अडवून चेष्टा करत असतात व रस्ता सोडण्यासाठी  विनवणीयुक्त गाणी व नृत्य म्हणजे गवळण व गणगौळण हे देवाचे जागरण किंवा गौळण या प्रकारातही दिसून येतात ,तसेच  वाडःमयीन भूमिकेतूनही गवळण हा प्रकार संत साहित्याच्या प्रासादिक दालनात लोकप्रिय झाला तसेच मराठीत भावपूर्ण रुपक गौळण होय हे रसिकांन समोर मांडून रसिकांची
मने जिंकत शुभेच्छा व्यक्त केल्या..व यानंतर सहभागी सदस्य यांनी आपल्या स्वरचित गवळण  पुढील  प्रमाणे सदस्य यांनी सदर गवळण सादर केल्या..
 भि.रा.पगारे, धुळे....नको करू मस्करी..कान्हा
सौ किरणताईं मोरे चव्हाण....चला बिगी बिगी जाऊ मथुरेला
सिंधु बोधले....दह्यादुधाची घागर
अनुजायीनी राजहंस.....गेला माधव सोडून मला
प्रिया मयेकर ....खेळ यमुनाडोही रंगला
अशोक बी कांबळे ....कान्हा सुरेख मैतर माझा..
स्वाती काळे...बाई मी गवळण
निशा दळवी....जाते पाण्याला...
 पल्लवी उमरे...माझा पदर ओढू नको
मनिषा खालकर....बाळ गोंडस लई देखणा
राधा ओझा....कान्हा करू नको शिरजोरी*
करूणा शिंदे....सुर घुमला बाई घुमला
शिल्पा सकळ कळे....वाट कान्हाची बघते आता...आणि अजूनही काही सदस्य यांनी सहभाग घेऊन गौळणमय वातावरणात कान्ह्याप्रमाणे बासरी छेडत सर्व रसिकांना  मंत्रमुग्ध वातावरणात  साहित्य मेजवानीचा आस्वाद  दिला.
आभार प्रदर्शन- श्री.योगेश चाळके मुक्तासुत यांनी मानून या कार्यक्रमाची सांगता झाली सदर महोत्सव गुगल मीटवर यशस्वी पणे पार पाडला.

Share This

titwala-news

Advertisement