आमदार सुहास कांदे यांनी दिली तरुण युवकांना संधी, तालुका उपप्रमुख पदीं चंद्रकांत जाधव यांची निवड.
नांदगाव तालुक्यातील शिवसेना पक्षाचे प्रामाणिक काम करणाऱ्या शिवसैनिकांना नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तरुणांना विविध पदावर नियुक्त्या देत काम करण्याची संधी दिली आहे.
नांदगाव तालुका शिवसेना संघटक पदी बोलठाण येथील जितेंद्र पाटणी तर नांदगाव तालुका उपप्रमुख गोंडेगाव येथील चंद्रकांत जाधव यांची निवड केली.
तर युवा सेना तालुका कार्याध्यक्ष वाल्मीक निकम, युवा सेना तालुका सरचिटणीस पांडुरंग गडाख , यांना पक्षवाढीसाठी सदर पदावर नियुक्ती देण्यात आले आहेत. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कामासाठी आमदार सुहास कांदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी शिवसेना नांदगाव तालुका प्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, अनिल तात्या रिंढे, रफिक पठाण, अनिल भगवान रिंढे, रवी रिंढे आदी उपस्थित होते.