मुरबाड तालुक्यातील साखरे सराईवाडी ही भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही या वाडीची कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नसून मंगळवारी सराई वाडीत दोन गरोदर महिलांना अम्ररुत पोषण आहार वाटप केले होते यामध्ये रेशनिंग गहू सडलेला शेंगदाणे बुरशी आणि किडे पडलेला लाल मसाला काळाकुट्ट .
तेल भाजीपाला यांचा तर तपास नाही तांदूळा मध्ये अळ्या असलेल्या असे पोषण आहार निकृष्ट दर्जाचे आढळून आले असल्याचे निदर्शनास आले आहे.या बाबतीत गटविकास अधिकारी रमेश आवचर यांच्या कडे लेखी तक्रार अशोक सराई किरण सराई विजय सराई दिपक सराई भगवान सराई वसंत सराई या ग्रामस्थांनी केली असून लवकरच संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी दिनेश जाधव यांनी केली असून यापुढे अंगणवाडी तील लहान मुले व गरोदर महिलांना मिळणारा पोषण आहार बंद करून मुलें व गरोदर महिला यांच्या खात्यात पैसे जमा करा अशी मागणी करण्यात आली आहे तालुक्यात 413 अंगणवाडी आहे.या सर्व ठिकाणी चौकशी करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी रमेश आवचार यांनी आदिवासी क्रांति संघटना अध्यक्ष दिनेश जाधव यांना सांगितले आहे.
........
याबाबत गटविकास अधिकारी रमेश आवचार यांनी सांगितले कि असे प्रकार तालुक्यात चालू असले तर त्यांचा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.......