ठाणे जनता सहकरी बँक लिमिटेड, टिटवाळा शाखेतर्फे ग्रामीण भागातील ग्रामस्थांसाठी 'आर्थिक साक्षरता कार्यशाळा...एक पाऊल सक्षमीकरणाकडे' ह्या अभिनव सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत तिसरी कार्यशाळा मानिवली येथे संपन्न झाली.
ह्या कार्यशाळेस टी.जे.एस.बी टिटवाळा शाखेचे व्यवस्थापक श्री.अमोल देसाई तसेच श्री.अनिकेत राखाडे ह्यांनी उपस्थीतांना आर्थिक साक्षारतेचे सोप्या भाषेत धडे दिले.
बँकेचे व्यवहार, आजकाल ऑनलाइन होणारी आर्थिक फसवणू आणि घ्यावयाची काळजी,कर्ज,बचतीचे महत्त्व, वारसाची नेमणूक, जीवन आणि आरोग्य विमा ह्या विषयांचा कार्यशाळेत सामवेश केला.
ह्या कार्यशाळेतील मान्यवरांचे स्वागत मानिवलीच्या मा.सरपंच श्रीमती.माया गायकर आणि मा.उप सरपंच श्री.चंद्रकांत गायकर ह्यांनी केले. तसेच हा सामजिक उपक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. हेमंत धुमाळ, श्रीमती. मनिषा गायकर ताई आणि श्री. गिरिश यशवंतराव ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.
भविष्यात ग्रामीण भागात अशा कार्यशाळा मोफत करण्याचा मानस टी.जे.एस.बी टिटवाळा शाखेचे व्यवस्थापक श्री.अमोल देसाई ह्यांनी व्यक्त केला.