सुपा ता.पारनेर जि.नगर औद्योगिक वसाहतीतील खराब टायर पासून ऑईल बनविणा-या सुपर इन्फो या कंपनीत सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागल्याने कंपनीचा कच्चा माल जळून खाक झाला.
कामावर असलेले दहा कामगार प्रसंगावधान राखून पळाल्यामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नसल्याचे समजते.
सुपा पोलीसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत कामगार सुरक्षित आहेत का ? याची खातरजमा केली.
धुराचे लोट दहा वीस किलोमीटर पर्यंत दिसत होते.
आगीच्या दुस-या घटनेत विळदघाट ता.नगर येथील एका पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या टँकरने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
एम आय डी सी अग्निशामक दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेवून आग आटोक्यात आणली.
टँकरशेजारी असलेल्या झाडाझुडपांना लागलेल्या आगीमुळे टँकरने पेट घेतल्याचे समजते.