आयुर्वेद क्षेत्रात "निमा"चे योगदान कौतुकास्पद
औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनानाच्या उद्घाटना दरम्यान नरेंद्र पवारांचे प्रतिपादन
नॅशनल इंटेग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) - कल्याण विभाग अँड महिला विभागाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त औषधी वनस्पतींचे प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
आयुर्वेद क्षेत्रात निमाचे काम मोठे आहे. कोरोनाच्या काळात निमाने सामाजिक जाणिवा जागृत ठेऊन अनेक रुग्णांना तंदुरुस्त करण्याचे काम केले. निमाचे अमृत महोत्सवी वर्षे हे आनंददायी आहे. आयुर्वेदिक उपचारांमध्ये मोठी ताकद आहे. सामान्य नागरिकांना आयुर्वेदाविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. आयुर्वेदाला पुरातन काळापासून महत्व आहे. मीसुद्धा कल्याण पश्चिम येथे साकारलेल्या महाराष्ट्र भूषण आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी बोटॅनिकल गार्डनमध्येही औषधी वनस्पतींची लागवड केली असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी कडोंमपाचे सचिव संजय जाधव, विष्णू बावणे, डॉ. स्वप्ना जाधव, अध्यक्ष श्याम पोटदुखे, डॉ. अनिल पाटील, डॉ. सोनाली फोड, डॉ.सुनंदा जाधव, डॉ.स्वाती काळे, डॉ.शिल्पा वुळवुळे, डॉ. अनिल उजागरे, डॉ.केदार परांजपे,डॉ. चेतन वैद आदी पदाधिकारी, डॉक्टर व नागरिक उपस्थित होते.