अभिरूप युवा संसद स्पर्धेत बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा तृतीय क्रमांक
Raju Tapal
December 20, 2021
185
अभिरूप युवा संसद स्पर्धेत बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा तृतीय क्रमांक
युवक बिरादरी यांच्या वतीने एम आय टी कॉलेज मध्ये पार पडलेल्या अभिरूप युवा संसद स्पर्धेत बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेसाठी बारामती, पुणे, सातारा, मुंबई, पनवेल या भागातून संघ आले होते.
प्रमुख पाहुणे संग्राम खोपडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रवी चिटणीस होते.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील ऋतिका शिंदे हिला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देण्यात आला.
या स्पर्धेत एम आय टी कॉलेजने प्रथम,एस पी कॉलेजने द्वितीय , बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला.
बारामती महाविद्यालयाचा संघ बनविण्यासाठी प्रा.भीमराव तोरणे, डॉ.विलास कर्डिले, राजा पांडे यांनी मार्गदर्शन केले.
संघनायक म्हणून प्रितम गुळूमकर, ए.बी.पाटील, प्रज्वल वारे, फजल पठाण, मेघना जाधव, निलेश जाधव यांनी संघामध्ये मोलाची भूमिका बजावली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर, उपप्राचार्य डॉ.अविनाश जगताप ,अभिनंदन शहा यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
Share This