• Total Visitor ( 369549 )
News photo

कुडाळमध्ये रिक्षा पलटी होऊन अपघात

Raju tapal July 08, 2025 70

कुडाळमध्ये रिक्षा पलटी होऊन अपघात

नर्सिंगचे विद्यार्थी किरकोळ जखमी

चालक फरार



कुडाळ :- कुडाळ शहरात आज दुपारी एक रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात नर्सिंगचे शिक्षण घेणारे सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. कणकवली पासिंगची ही रिक्षा होती, तर रिक्षाचालकाचा एक मित्र गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, अपघात होताच रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.



मिळालेल्या माहितीनुसार, दुपारीच्या सुमारास ही रिक्षा कुडाळ शहरातून जात असताना अचानक पलटी झाली. रिक्षात नर्सिंगचे सहा विद्यार्थी प्रवास करत होते, जे या अपघातात सुदैवाने किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.



या अपघातात रिक्षाचालकाचा एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. अपघात घडल्यानंतर तात्काळ घटनास्थळी जमाव जमला होता, मात्र या गोंधळात रिक्षाचालकाने आपली रिक्षा तिथेच सोडून पळ काढला. पोलिस आता फरार रिक्षाचालकाचा शोध घेत असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिस करत आहेत.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement