बल्याणीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा....
आज दि 29/4/2025 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या टिटवाळा प्रभाग मधील बनेली येथील अनाधिकृत बांधकामावर निष्कसनाची कारवाई करण्यात आली.
अ प्रभाग अंतर्गत असलेल्या बल्यानी येथील सुरू असलेले 167 सिमेंट काँक्रीटचे दगडी फौंडेशन चे बांधकाम तसेच 3 तयार रूम चे बांधकाम 2 JCb व ठेकेदारांची 15 माणसे,पोलीस कर्मचारी,वरिष्ठ लिपिक आणि महापालिका कर्मचारी यांच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.
सदर कारवाईचे वेळेस स्थानिक नागरिकाचा प्रचंड विरोध असताना सुद्धा कारवाई पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती प्रमोद पाटील सहाय्यक आयुक्त अ प्रभाग यांनी दिली.