आदर्श जिल्हा परिषद शाळा पुरस्कार सन्मानित
स्वच्छ व सुंदर
जिल्हा परिषद शाळा डोंगरन्हावे
मुरबाड प्रतिनिधी.
पत्रकार तसेच शिवराज्य प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री राहुल गजानन बिराडे यांनी मुरबाड तालुक्यातील आपल्या डोंगरन्हावे गावातील आदर्श शाळा पुरस्कार सन्मानित जिल्हा परिषद शाळा डोंगरन्हावे या शाळेला नुकतीच भेट दिली.
भेट देण्याचं महत्वाचं कारण की सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरनानुसार 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या शाळा बंद तसेच समायोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या विरोधात मागील 3 वर्ष शिवराज्य प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य काम करत आहे. या शाळेच्या भेटीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कशी वाढेल त्यासाठी शाळेचा परिसर, मुलांना पोषक आहार, मुलांचं आरोग्य, पाण्याची सोय, डिजिटल व इंग्रजी शिक्षण , संस्कार, व शिकवण कशी असावी हे सरकारला दाखवून व पटवून देण्यासाठी की तुम्ही अशा प्रकारे जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये उपाययोजना करून निर्माण करून द्या , शाळा तुम्हीच वाचवू शकता. येथे कष्टकरी, शेतकरी व गरीबाची पोर शिकतात. आणि का शिकतात कारण येथे लाखों रुपयांची फी नाही पन लाखोरूपयांच्या पलीकडंच शिक्षण, संस्कार व शिकवण दिली जाते.
या शाळेसाठी व मुलांसाठी जे अतोनात मेहनत घेत आहेत ते या शाळेचे शिक्षक भास्कर पष्टे सर , नारद पडवळ सर, मंगला भोईर मॅडम, वृषाली सातपुते मॅडम, संतोष उमवणे सर, रामू वाघ सर, व दामू आढारी सर या सर्वांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
पत्रकार राहुल बिराडे यांनी सर्व मुलांच्या आई-वडिलांना विनंती व आव्हाहन केले आहे की, आपल्या मुलांना नक्की जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिकवा कारण जेव्हा तुम्ही आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिकवणार तेव्हाच या शाळा टिकणार व गरीबाची पोर शिकणारं