• Total Visitor ( 84917 )

अज्ञात वाहनाने दुचाकीस ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार

Raju Tapal October 27, 2021 57

अज्ञात वाहनाने दुचाकीस ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार ;  वृद्ध महिला जखमी

              सातारा - मेढा रस्त्यावरील नंदीचा चढ वळणावर अपघात

 

अज्ञात वाहनाने दुचाकीस ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सातारा मेढा रस्त्यावरील नंदीचा चढ वळण रस्त्यावर मंगळवार दि.२६ /१०/२०२१ रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. 

इंगळेवाडी ता.जि.सातारा येथील युवक  तानाजी दौलत इंगळे वय -३२ हा त्याची चुलती यमुना पांडूरंग इंगळे वय -७२ हे दोघे साता-यातील रूग्णालयात जात होते. वाटेतच नंदीचा चढ येथील वळणावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस ठोकरले. या अपघातात तानाजी इंगळे हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्याची चुलती यमुनाबाई इंगळे यांचा पाय तुटून गंभीर जखमी झाल्या.

तानाजी इंगळे हा सातारा येथील प्रिंटींग प्रेस मध्ये काम करत होता. सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे उपनिरीक्षक एस व्ही देव यांच्यासमवेत पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी यमुनाबाई इंगळे यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Share This

titwala-news

Advertisement