ऍड.जितेंद्र जोशी पॅनल क्रमांक ३ मधून निवडणूक लढवणार
राजू टपाल.
टिटवाळा :- प्रत्येक क्षण समाजासाठी प्रत्येक क्षण विकासासाठी असा ध्यास घेतलेले जनसेवा सामाजिक कार्यसंस्थेचे संस्थापक व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे टिटवाळा अध्यक्ष ऍड.जितेंद्र जोशी पॅनल क्रमांक ३ मधून निवडणूक लढवणार आहेत.
आमची तळमळ विकासासाठी आमचा लढा सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या हक्काचा माणूस म्हणून ऍड.जितेंद्र जोशी हे प्रत्येक सामाजिक कामासाठी नेहमीच धावून जात असतात. त्यांनी टिटवाळा परिसरातील आरक्षित जागेवर सुसज्ज इस्पितळ व्हावे यासाठी सन २००६ पासून आपल्या जनसेवा कार्यसंस्थेच्या माध्यमातून मागणी केलेली आहे. मांडा पश्चिमेतील महापालिकेचे आरोग्य केंद्र बंद स्थितीत असताना सन 2006 साली जनसेवा सामाजिक कार्यसंस्थे मार्फत टाळा ठोको आंदोलन करून पुन्हा आरोग्य केंद्र सुरु करून घेतले त्याचा लाभ सगळेच नागरिक आजही घेत आहेत. दळवीवाडा ते सुमुख सोसायटी येथे व वासुंद्री रोड येथे संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा करून पथ दिवे लावून घेतले. तसेच कल्याण येथे प्रांतअधिकारी ह्यांची नेमणूक होण्यासाठी तत्कालीन आमदार व प्रशासन ह्यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार कल्याण येथे प्रांत अधिकारी रुजू.
कल्याण तहसीलदार कार्यालयात स्वच्छतागृहाचा प्रस्ताव ठेवून करून घेतले. तर गोवेली ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालायाचा दर्जा मिळणेसाठी मागणी प्रलंबित. मांडा टिटवाळा परिसरात झेब्रा क्रॉसिंग करून दिशादर्शक फलक व विशेष शासकीय,निमशासकीय कार्यालय,शाळा,दवाखाने,पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस, बँका इत्यादी महत्वाच्या ठिकाणी दिशादर्शक व नाम फलक लावण्याची मागणी केली होती.
तसेच कल्याण तालुका (टिटवाळा) पोलीस ठाण्यात येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मागापालिका प्रशासनाकडून 10 ट्रॅफिक वार्डन मंजुर करून घेतले. मांडा टिटवाळा शहरातील अनधिकृत पार्किंग बाबत टोविंग व्हॅनची ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक ह्यांच्याकडे मागणी केली आहे. तर कल्याण तालुका पोलीस ठाणे पोलीस आयुक्त ठाणे शहर ह्यांच्या अखत्यारीत येण्यासाठी मागणी व प्रयत्न सुरु आहेत. तर मारुती मंदिर तलाव सुशोभीकरण साठी मागणी करण्याबरोबरच तलावा जवळ निर्माल्य कलश ठेवून तलावामध्ये जलप्रदूषण होऊ नये म्हणून जनजागृती केली. या आणि अश्या कितीतरी सामाजिक कार्य एडव्होकेट जितेंद्र जोशी यांनी केलेले आहे. आपल्या वकिलीचा फायदा हा गोरगरीब जनतेला हि करून देत योग्य तोच सल्ला देऊन नागरिकांना यथायोग्य ती मदत करतात. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय ब्राम्हण सभेच्या नियुक्तीत त्यांचे टिटवाळा शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या सर्वच सामाजिक कार्याची दखल मांडा टिटवाळा परिसरातील नागरिक नक्कीच घेतील अशी आशा त्यांना वाटत असल्याने त्यांनी येत्या केडीएमसी निवडणुकीत एक आगळा वेगळा प्रकार करून प्रस्थापितांना शह देण्याचा प्रयत्न करीत निवडणुकीत आपला पॅनल उभा करण्याचा ठाम निर्णय माणशी करून त्याप्रमाणे त्यांची आखणीही सुरु असल्याची माहिती दिली. त्यामुळे एका नवीन समीकरणांची नांदी मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांना नक्कीच पहावयाला मिळणार आहे.