अजित पवारांचा हुकमी एक्का पायउतार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला
मुंबई:-गेली तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते. त्यांचा राजकीय वरदहस्त असल्याने हे घडलं असा थेट आरोप होत होते.त्यासोबतच मुंडे यांचा राजीनामा घ्या अशीही मागणी होत होती. मात्र, मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी टाळाटाळ केली.राजीनामा घेतला नाही. दरम्यान काल संतोष देशमुख यांना कसं मारलं याचे फोटो समोर आले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र पेटला. त्यानंतर अखेर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.आता तो राज्यापालांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आहेत. त्यांच्याकडे राजीनाम्याचं पत्रही आहे. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. पीए राजीनाम्याचं पत्र घेऊन गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, यावेळी माध्यमांनी अजित पवार यांना विचारलं असता ते रागावल्याचं दिसलं. त्यावेळी पंकजा मुंडे यांना विधीमंडळ परिसरात पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना विचारलं असता त्यांनी काही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली.
सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन तास बैठक झाली. या बैठकीला धनंजय मुंडें यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते. या राजीनाम्याबाबत चर्चा झाली. धनंजय मुंडेंना राजीनामा दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल रात्री देवगिरी बंगल्यावर 8.50 वाजता बैठक सुरु झाली. त्यानंतर साडे दहा वाजता ही बैठक संपली. या दीड तासात राजीनाम्याबाबत चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती.
या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह नऊ आरोपींना मोक्का कायद्याखाली अटक देखील झाली. त्यानंतर कोर्टात या सर्व हत्याकांडाचा सूत्र वाल्मिक कराड हाच असल्याचे उघडकीस आले. कोर्टात या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात अखेर ही हत्या कशी झाले त्याच्या 15 व्हिडीओ आणि 8 फोटो पुरावा सादर करण्यात आले आहेत. या फोटोंना पाहून आरोपींनी हैवानालाही लाजवले असे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.जयराम चाटे, कृष्णा आंधळे, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी हैवानाला लाजवेल असे काम केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. तो मी स्वीकारलेला आहे. तो राजीनामा पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील उलगडू लागले अन् वाल्मीक कराड हा येथील मुख्य सूत्रधार असल्याचे आता समोर आले आहे. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे खुद्द मुंडे यांनीच सुरुवातील सांगितले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती तसेच त्यांचे आर्थिक संबंध देखील असल्याचे पुरावे आमदार सुरेश धस, आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिले होते. यामुळे धनंजय मुंडेंचा पाय खोला गेला होता.