• Total Visitor ( 133924 )

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इंदापूर शाखेकडून एस टी कर्मचा-यांच्या अन्यायाविरुद्ध निदर्शने

Raju Tapal November 12, 2021 46

 

गेल्या चार दिवसांपासून एस टी कर्मचारी संपावर गेल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी बंद आहे. त्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या शाळा,महाविद्यालयात येणा-या विद्यार्थ्यांना, रूग्णांना त्याचा तीव्र फटका बसला आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिस्षद इंदापूर शाखेकडून ११ नोव्हेंबरला इंदापूर येथील प्रशासकीय भवन प्रवेशद्वारासमोर तसेच शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करून शासनाचा निषेध करण्यात आला.

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे इंदापूर तालुकाप्रमुख भरत आसबे यावेळी म्हणाले, अनेक वर्षांपासून एस टी महामंडळाचे कर्मचारी एस टी ला राज्य सरकारमध्ये सामावून घ्यावे ,इतर विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करत आहेत. शासनाने योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले अजून तोडगा निघत नाही. ११ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा महाविद्यालये सुरू होत आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थी बसचा पास काढून प्रवास करतात. मात्र बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी लवकरात लवकर तोडगा काढून एस टी कर्मचा-यांना न्याय द्यावा , विद्यार्थ्यांचे नुकसान टळावे यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र  आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा भरत आसबे यांनी यावेळी दिला.  

इंदापूर तहसील कार्यालयात याबाबतचे निवेदन देण्यात आले. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे इंदापूर तालुकाप्रमुख भरत आसबे, शहरमंत्री अवधूत बाचल , सहमंत्री हिंगमिरे, आंदोलनप्रमुख सुरज खामगळ, स्वप्निल भंडलकर , श्रीकांत चिंगळे, शेखर गुजर, प्रतिक रेडके, यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Share This

titwala-news

Advertisement