केंद्र सरकारने शिक्षणावरील खर्च वाढवावा, शाळांना सुविधा, शिक्षकांना सन्मानपूर्वक वेतन द्यावे आम. जयंत आसगावकर
ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशनचे उद्घाटन संपन्न
अमरावती :- केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या बजेटमध्ये शिक्षणावरील खर्च कमी केला आहे.तो वाढविण्यात यावा, शाळांना सुविधा द्याव्यात तसेच शिक्षकांना सन्मानपूर्वक वेतन द्यावे असे विचार आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांनी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंटरी टीचर्स ऑर्गनायझेशनच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर येथे व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे होते.
यावेळी आसगांवकर पुढे म्हणाले सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे ,शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असून सरकारने त्यासाठी किमान जीडीपीच्या दहा टक्के खर्च केला पाहिजे. आज देशभरातून आलेल्या सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींनी शिक्षण शिक्षकांच्या प्रश्नासाठी व नवीन शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यासपूर्वक चर्चा करून ठराव करण्यात यावेत. त्यासाठी आपण सर्वजण मिळून पाठपुरावा करू - लढा करू असे सांगितले. यावेळी कॉ. अतुल दिघे यांनी शिक्षण सरकारचे भगवेकरण करून शिक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत चिंता व्यक्त करून शाहू, फुले, आंबेडकर यांचा समतावादी विचार हे सरकार संपवत असल्याचे मत व्यक्त केले .याबाबत सर्व शिक्षकानी जागरूक राहून देशातील एकता अखंडता व सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी संघर्ष केला पाहिजे असे सांगितले. कार्यालय सचिव सुधाकर सावंत यांनी संघटनेचा अहवाल -शिक्षणाची सद्यस्थिती, शिक्षकांचे प्रश्न आणि संघटनात्मक अहवाल सादर केला. त्या अहवालावर देशभरातल्या प्राथमिक शिक्षक यांच्या संघटनांच्या विविध प्रतिनिधींनी चर्चा केली यामध्ये जम्मू-काश्मीरचे सलीम सागर, ओरिसाचे धनंजय पटनायक ,उत्तर प्रदेशचे रविशंकर यादव, आंध्रप्रदेशचे रामन रेड्डी तेलंगणाचे पाॅल रेड्डी, राजस्थानचे राममूर्ती स्वामी, बिहारचे उमेश कुमार सिंह, पश्चिम बंगालचे, अतिउर रहमान,महाराष्ट्रातून सुरेश पवार, राजस्थानचे पूनम बिश्नोई इत्यादींनी विविध प्रश्नावर सविस्तर विचार व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी महाराष्ट्रातील शिक्षणाची परिस्थिती सांगून देशभरातून आलेल्या शिक्षकांचे राज्याच्या वतीने स्वागत केले व देशभरातील प्रश्नासाठी सर्वांनी एकीने लढण्यासाठी सर्वांना हाक दिली . या कार्यक्रमाची सुरुवात झारखंडचे नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूलाल झा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली, शहीदाना मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. शिक्षकांनी सादर केलेल्या स्वागत गीताने सर्वांचे स्वागत केले. यावेळी विश्वनाथ मिरजकर ,शालिकराम पटेल, कॉ. रघुनाथ कांबळे, शिक्षक समितीचे राज्यनेते उदयराव शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली. तसेच एस.आर. पाटील, बाबासाहेब लाड, प्रभाकर कमळकर आधी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन उमेश देसाई, संजय पाटील, संजय कडगावे ,उत्तम कुंभार, सुनील पाटील, विनोद कुमार भोंग ,संदीप जाधव इत्यादींनी केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले सूत्रसंचालन रावसाहेब कीर्तिकर व उमर जमादार यांनी केले या सत्राचे आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी मांडले.असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.