आंबिवली येथील एनआरसी कंपनीच्या नायलॉन प्लॅंट येथे भिंतीचे बांधकाम सुरु असल्याने खडी व रेती रस्त्यावरच टाकल्याने अनेक गाड्यांचा अपघात होऊन त्यातील चालक मालकासह प्रवासीही जखमी झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडलेली असून सदरील रस्त्यावरील रेती व खडी हि बेकायदेशीर पणे टाकल्यामुळे हा अपघात झालेला आहे. यामध्ये प्रामुख्याने एमएच ०५ - डी एल ३५२० हि मानवली येथील रिक्षाचालक कपिल गायकर यांच्या हि गाडीचा अपघात झाला. एकूण तीन रिक्षांचा येथे अपघात झाला असून एमएच ०१ सी ए १११० या चारचाकी गाडीचा देखील अपघात झाला असल्याचे समजते. एकंदरीत या रस्त्यावर लाईट नसल्यामुळे आणि त्यातच रस्त्यावर खाडी व रेती टाकलेली असल्यामुळे सदरचा अपघात होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव यांनी दिली.