महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरूर येथील माहेर संस्थेतील अनाथ मुलांना फळवाटप, खाऊवाटप व पुस्तक वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ तालुका संघटक कांतीलाल शर्मा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ऍड. स्वप्निल किशोर माळवे, रस्ते आस्थापना तालुकाध्यक्ष सुदाम चव्हाण, महिला आघाडी तालुकाध्यक्ष डॉ.वैशाली साखरे, माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, महिला आघाडी शहराध्यक्ष शारदा भुजबळ, मनसे जनहित उपाध्यक्ष बंडू तात्या दुधाणे, संकेत निघूल, दादा भुजबळ, चंदुभाऊ जाधव, मंगेश कांबळे यावेळी उपस्थित होते.