• Total Visitor ( 134434 )

अमरावती जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त झालेले शिक्षक गट विमा रकमेच्या प्रतीक्षेत

Raju tapal March 04, 2025 36

अमरावती जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त झालेले शिक्षक गट विमा रकमेच्या प्रतीक्षेत

अमरावती :- येथील जिल्हा परिषदेतून शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना वर्ष ओलांडल्या नंतरही गट विम्याची रक्कम मिळाली नसल्याने सेवानिवृत्त शिक्षक कार्यालयात गट विम्याची रक्कम मिळावी म्हणून येरझरा मारत आहे.
सेवानिवृत्त झालेले काही शिक्षक गट विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहे.प्रशासनाने ही रक्कम अदा करून सेवानिवृत्त शिक्षकांना दिलासा देणे आवश्यक आहे.
गट विमा योजना १९८२ ही १ मे १९८२ पासून लागू झाली आहे. ही योजना १ मे १९८२ रोजी सरकारी सेवेत असलेल्या किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू आहे आणि ती अनिवार्य आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी विमा संरक्षण आणि निवृत्तीनंतर त्यांच्या संसाधनात वाढ करण्यासाठी एकरकमी रक्कम (कमी खर्चात आणि पूर्णपणे अंशदान आणि स्व-वित्तपुरवठा आधारावर) असे दुहेरी फायदे प्रदान करण्याचा हेतू आहे.
बचत निधी अंतर्गत जमा झालेली रक्कम निवृत्तीनंतर निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या दराने व्याजासह दिली जाते.परंतु येथील जिल्हा परिषदेतून शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना वर्ष ओलांडल्या नंतरही गट विम्याची रक्कम मिळाली नसल्याने सेवानिवृत्त शिक्षक  कार्यालयात गट विम्याची रक्कम मिळावी म्हणून पाठपुरावा करत आहे.परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

सेवानिवृत्त झालेले काही शिक्षक गट विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहे.प्रशासनाने ही सेवा निवृत्तीच्या क्रमाप्रमाने रक्कम अदा करून सेवानिवृत्त शिक्षकांना दिलासा देणे आवश्यक आहे.

राजेश सावरकर,राज्य प्रसिध्दी प्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती
 

Share This

titwala-news

Advertisement