नालंदा शाखेचा आणखी एक अभिनव उपक्रम
बौद्ध वधु वर परिचय मेळावा संपन्न
कल्याण तालुका अंतर्गत असलेल्या टिटवाळा विभागातील भारतीय बौद्ध महासभेच्या नालंदा शाखेच्या माध्यमातून “बौद्ध वधु-वर परिचय मेळावा” दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२५ या दिवशी सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा पश्चिम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
भारतीय बौद्ध महासभेच्या ठाणे जिल्ह्यावर विविध पदांवर काम केलेले ज्येष्ठ मार्गदर्शक के.एल.उघडे गुरुजी, बहुजन उत्थान समितीचे अध्यक्ष विजयजी भोईर,नालंदा शाखेचे अध्यक्ष आदरणीय संदिप घायवट गुरुजी, उपाध्यक्ष बौद्धाचार्य आदरणीय पंढरीनाथ चंद्रमोरे गुरुजी,सम्यक संबोधि प्रतिष्ठानचे अध्यक्ष डी.बी. कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे टिटवाळा विभागातील ज्येष्ठ मार्गदर्शक बल्लाळ गुरुजी यांच्या हस्ते व उपस्थितीत बौद्ध वधु वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले .या वधुवर मेळाव्याचे अध्यक्षपद नालंदा शाखेचे अध्यक्ष बौद्धाचार्य आदरणीय संदिप घायवट गुरुजी यांनी भूषवीले. या कार्यक्रमासाठी वर्धा, रायगड,अहिल्यानगर, नागपुर,नाशिक, सोलापूर, जळगाव, अमरावती, हिंगोली, बीड,ठाणे अशा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याचे तसेच गोवा राज्यात स्थायिक असलेले उमेदवार सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रमाला आणि नालंदा शाखेला विजय भोईर तसेच आदरणीय के.एल. उघडे गुरुजी, भारतीय बौद्ध महासभा कल्याण तालुक्याचे माजी पदाधिकारी आदरणीय भालेराव गुरुजींनी शुभेच्छा दिल्या.
सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. प्रत्येक उमेदवाराने आपला परिचय विचारमंचावर येऊन दिला. वधुवर परिचय मेळाव्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.
नालंदा शाखेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने उत्तम नियोजन करण्यात सहकार्य केले. सर्व उपस्थितांना चहा, पाणी व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
सामुदायिक सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.