अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथील गिरिजात्मक गणपती मंदिरात,तसेच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, विद्युतरोषणाई करण्यात आली.
मंदिरे व धार्मिक स्थळे खुली झाल्यानंतर प्रथमच अंगारकी चतुर्थी आल्याने भाविकांची दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी होती.
लेण्याद्री येथे देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई, विश्वस्त सदाशिव ताम्हाणे, जयवंत डोके यांच्या हस्ते पहाटे श्रींचा अभिषेक, महापुजा व आरती करण्यात आली.
कराड येथील मधुकर मारूती पाटील या भाविकाने अन्नदानाकरिता १० हजार १ रूपयांची देणगी दिली.
श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीला डाळिंब व केळींचा महानैवेद्य ठेवण्यात आला.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वाजता अभिषेक व नैमित्तिक पुजा करण्यात आली.
भाविक संदीप नवले यांच्या वतीने १००१ डाळिंब, भावेश कामदार यांच्या वतीने ५०१ केळींचा महानैवेद्य श्री महागणपतीला ठेवण्यात आला.
नानासाहेब दिनकर पाचूंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.
मंदीराभोवती आळंदी येथील राजू सिन्नरकर यांनी मनमोहक, आकर्षक रांगोळी काढली होती.