अंगावर वीज पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू ; वडगाव मावळ येथील खांडी रस्त्याच्या कडेकडची
घटना
----------------------
बैल आणण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना वडगाव मावळ येथील खांडी रस्त्याच्या कडेला आंब्याखाली घडली.
राज भरत देशमुख वय १४ असे वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
आज बुधवारी बैलपोळा असल्याने मंगळवारी सायंकाळी ५ वाजता राज देशमुख हा बैल आणण्यासाठी गेला असता वीज पडल्याचा मोठा आवाज झाल्याने राजचे वडील भरत देशमुख यांनी जावून पाहिले असता खांडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली राज हा पडलेला आढळून आला.
जवळ जावून पाहिले असता त्याच्या कानातून व नाकातून रक्त आले होते. डोक्यावरचे केस जळाले होते. पोलीस निरीक्षक विलास भोसले, उपनिरीक्षक विजय वडोरे , किरण नांगरे, सिद्धार्थ वाघमारे, सचिन काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
कान्हे फाटा येथील ग्रामीण रूग्णालयात राज देशमुख याला घेवून गेले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता मृत झाल्याचे घोषित केले