आरपीआयतर्फे मुलभूत नागरीसुविधांसाठी केडीएमसीला अर्ज
राजू टपाल.
टिटवाळा:- मांडा पश्चिमेतील अनेक नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची बाब निदर्शनास आल्याने आरपीआयचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर यांनी केडीएमसीच्या अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांना लेखी विनंती अर्ज येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची विनंती केलेली आहे.
मांडा पश्चिमेतील आझाद नगर,मौर्य नगर,सुवर्णाचे चाळ इत्यादी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी फार कमी दाबाने येत असल्याने तसेच पाणी कमी व वेळेवर येत नाही. त्याच बरोबर परिसरातील गटारांची साफसफाई वेळेवर होत नसल्याने येथील गटारे तुडुंब भरलेली आहेत. तर काही गटारांवरचे झाकणे तुटलेली असल्याने येथून जीव मुठीत धरून नागरिकांना जावे लागते. परिसरात कोणत्याच प्रकारची फवारणी होत नसल्याने परिसरात दुर्गंधी बरोबरच आजारपणात हि वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच परिसरात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अंधार असतो त्यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो त्यामुळे लाईट ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भोईर यांनी अ प्रभाग सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली असून सदरील मागण्यांची वेळीच पूर्तता न झाल्यास परिसरातील नागरिकांना घेऊन आरपीआय पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा विजय भोईर यांनी दिलेल्या निवेदनात केलेला आहे.