शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांची नियुक्ती
शिरूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरश्र्चंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा प्रभारी या पदावर शिरूर हवेली तालुक्याचे माजी आमदारअशोक पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरश्र्चंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत राजाराम पाटील यांनी याबाबतचे पत्र माजी आमदार अशोक पवार यांना दिले आहे.
माजी आमदार अशोक पवार यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात असे म्हटले आहे, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरश्र्चंद्र पवार पक्षासाठी आजवर आपण दिलेले योगदान लक्षात घेवून आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी -शरश्र्चंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा प्रभारी या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. पक्षांची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी पण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा मला ठाम विश्वास वाटतो.समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून पक्षाची ध्येयधोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरश्र्चंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे नियुक्ती पत्रात म्हटले असून नियुक्तीबद्दल माजी आमदार अशोक पवार यांचे अभिनंदनही नियुक्तीपत्रात करण्यात आलेले आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे)