समाजभूषण पुरस्काराने अरविंददादा ढमढेरे सन्मानित
शिरूर :- तळेगाव ढमढेरे येथील ज्येष्ठ नेते अरविंददादा ढमढेरे यांना रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५रोजी केंदूर येथे" शिरूर तालुका समाजभूषण पुरस्कार "देऊन सन्मानित करण्यात आले.
केंदूर (ता. शिरूर )येथे मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा २०२५ रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडल्या.
शिरूर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय बाबूरावजी पाचर्णे यांच्या नावाने स्वर्गीय बाबुरावजी पाचर्णे साहेब समाजभूषण पुरस्कार शिरूर तालुक्यात आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जातो.
यावर्षी शिरूर तालुक्यातील जेष्ठ नेते अरविंददादा ढमढेरे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अरविंद दादा ढमढेरे हे पुणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यात शिरूर तालुक्यात गेली पाच दशके कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चांदीची गदा आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सदर पुरस्कार घोडगंगा सहकारी कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखाताई बांदल, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे ,शेखर दादा पाचुंदकर, कात्रज डेअरीच्या माजी अध्यक्षा केशरताई सदाशिव पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, शिक्रापूरचे माजी आदर्श सरपंच रामभाऊ सासवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला.
याच दिवशी साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाची विद्यार्थिनी व स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेची माजी विद्यार्थिनी प्रतीक्षा प्रवीण ढमढेरे हिलाही शिरूर तालुका मल्ल सम्राट २०२५ या चुरशीच्या स्पर्धेत शिरूर उपकेसरी हा किताब मिळाल्याबद्दल तिचेही त्या ठिकाणी अभिनंदन व सत्कार करून गौरविण्यात आले.
अरविंद दादा ढमढेरे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजयरावढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदिच्छा व्यक्त करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.