आषाढी एकादशी निमित्त शेतकरी वारकरी परमार्थिक संघ यांच्या वतीने शहापूर , कल्याण, मुरबाड आशा सहा दिडया माळशेज घाट चढून गेल्या.विठ्ठल विठ्ठल,गॅनबा तुकाराम,व किर्तन,भजन करुन ही वारकरी मंडळी रोजचे सात दिवसांचे अंतर पार करीत आहे.या वारीमध्ये महिला व लहान मुले तसेच जेष्ठ नागरिकांचा देखील सहभाग आहे.
दोन वर्षे कोरोना महामारी काळा पासून ह्या दिंड्या बंद होत्या मात्र शासनाने परवानगी दिल्या मुळे दोन वर्षाची कसर भरून काढण्यासाठी यावर्षी भरपूर मोठा प्रमाणात भाविक भक्तांचा उत्साह असून प्रत्येक दिंडी मध्ये गर्दी दिसत असून माळशेज घाट पार करून दिंड्या पुणे जिल्हात दाखल झाल्या आहेत.