ऐरोली विधानसभेतून भाजपा उमेदवार गणेश नाईक यांनी प्रचाराचा नारळ फोडला.....
शिवसेना ठाकरे गटात उमेदवारीवरून दोन गट पडल्याने नाईकांचा विजय झाला सोप्पा.....
शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण असून तीसऱ्या सक्षम पर्यायाच्या शोधात शिवसैनिक....
ऐरोली विधानसभा क्षेत्राचे भाजपा उमेदवार गणेश नाईक यांनी प्रचाराचा नारळ फोडत निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपा उमेदवार गणेश नाईक यांच्यासमोर कोणताही तगडा उमेदवार सध्या नसल्याने नाईकांचा विजय सहज होईल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.