• Total Visitor ( 84601 )

बहिणीचा मृतदेह विहीरीत आढळून आल्यानंतर स्वत:च्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार ; शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील घटना

Raju Tapal November 19, 2021 37

बहिणीचा मृतदेह विहीरीत आढळून आल्यानंतर स्वत;च्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून खून करण्याची घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे गुरूवार दि.१८ नोव्हेबरला घडली.

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बुधवार दि.१७ /११/२०२१ रोजी समीर भिवाजी तावरे वय -३५ यांची बहिण माया सोपान सातव वय -३२ या घरातून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. 

कुटूंबिय त्यांचा शोध घेत होते. 

गुरूवरी दि.१८ नोव्हेंबरला माया यांचा मृतदेह विहीरीत तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला.

हा धक्का बसल्याने समीर याने घरी येवून पत्नी वैशाली तावरे वय - २८ हिच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले. अचानक केलेल्या या हल्ल्यात समीरची पत्नी वैशाली जागीच ठार झाली.

या घटनेनंतर संतप्त अवस्थेतील समीर याने स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नागरिकांनी समीरला तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

समीर तावरे याच्यावर दौंड येथे उपचार चालू असल्याचे समजते.

मांडवगण फराटा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून या घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

Share This

titwala-news

Advertisement