• Total Visitor ( 84302 )

बहुजन विकास आघाडीच्या कांचन ठाकूर यांनी केला भाजपात प्रवेश

Raju Tapal May 20, 2022 36

बहुजन विकास आघाडीच्या कांचन ठाकूर यांनी केला भाजपात प्रवेश
■ युवकांच्या संघटनासोबत प्रश्नावर लढण्याची आवश्यकता - माजी आमदार नरेंद्र पवार

भारतीय जनता पार्टी ही विचारांची पार्टी आहे, राष्ट्रप्रथम हे ध्येय ठेऊन काम करणारा राजकीय पक्ष आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या  कामावर आनंदी होऊन अनेकजण पक्षात प्रवेश करत आहेत, कांचन ठाकूर यांनीही भाजपच्या विचारांवर विश्वास ठेवला ही आनंदाची गोष्ट आहे. राज्यात भाजपा सरकार असताना अनेक महत्वपूर्ण योजना देवेंद्रजींनी राबविल्या, समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला, त्याचा प्रत्यय आजही समाजात वावरताना येतो.
युवा नेत्यांनी युवकांच्या संघटनासोबतच प्रश्नांवर काम केले तर पक्षाची प्रतिमा अजून उजळ होईल असे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.
हा पक्ष प्रवेश कार्यक्रम मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडला.

भारतीय जनता पार्टीचा अंत्योदय कल्याणाचा विचार सामान्य व्यक्तींना आपला वाटतो आहे, देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारे मोदीजी आणि राज्याला विकासाचे स्वप्न दाखवणारे देवेंद्रजींच्या यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येऊ शकते. युवा पिढीने भाजपच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन आमदार प्रसाद लाड यांनी बोलताना केले.

युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यभरात चांगले संघटन उभे राहिले आहे, वेगवेगळ्या आंदोलन आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारले जात आहेत, येणाऱ्या काळातही युवा मोर्चा अधिक आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडेल, सोबतच युवकांच्या संघटनवाढीवर भर देण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त करत कांचन ठाकूर यांचे स्वागत करत त्यांना भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी प्रदेश सचिव पदी निव केली असल्याची घोषणा केली.

दरम्यान कांचन ठाकूर यांच्यासह शेकडो युवकांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, त्यांचे स्वागत केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशवजी उपाध्यये, प्रवक्ते गणेश हाके, भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश सहसंयोजक संतोष आव्हाड, भाजपा भटके विमुक्त आघाडी युवा सहसंयोजक अशोक शेळके, बिंजेंद्र कुमार, रामदास मेहेर आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This

titwala-news

Advertisement