बालगंधर्व रंगमंदिर वाचवण्यासाठी काँग्रेसने बालगंधर्व बचाव आंदोलन केले.
बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याचे सौंदर्य आहे. ते पाडून पुण्याच्या सौंदर्यावर घाला घालू नये, पुण्याची संस्कृती टिकली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बालगंधर्व रंगमंदीर पाडू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात येवून केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी पुनर्वसनाचा घाट सत्ताधारी करत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला.
बालगंधर्व रंगमंदिर सभागृह पाडण्याचा प्रस्ताव महापालिकेने गेल्या काही वर्षापूर्वी मांडला आहे. तो प्रस्ताव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. महापालिका जोपर्यंत हा प्रस्ताव मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवणार असल्याचे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावेळी सांगितले.
माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे, काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा पुजा आनंद पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी , महिला कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.